बँकिंग क्षेत्रात संपुर्ण महाराष्ट्र देशामध्ये अग्रेसर असतांना, राज्यातील अग्रेसर निधी कार्यक्षेत्र म्हणून नावलौकिक डि. वाय. पाटील जनविकास निधी लि. ने प्राप्त केले आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज, विवीध सुविधांसह आधुनिक शाखांद्वारे, ग्राहकांना, हितचिंतकांना वेळोवेळी बँकिंग व्यवहाराच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे करीत, होणारी गैरसोय टाळण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहण्याचा प्रयन्त करीत आहोत.

जनमानसातील आमच्याबद्दल असलेल्या अतूट विश्वासामुळे व मा. चेअरमन व संचालक मंडळाच्या जनसंपर्कामुळे शाखेमधील ठेवींमध्ये दिवसेंदिवस वृद्धी होत आहे. स्थापने पासूनच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांपर्यंत जावून त्यांना सेवा दिलेली आहे. तसेच कष्टकरी, छोटे उद्योग, छोटे व्यवसाय यांना कर्ज देवून त्यांच्या व्यवसायाला नविन चालना दिलेली आहे. सभासद व ग्राहकांच्या गरजे प्रमाणे बचतीच्या व कर्जाच्या योजना तयार करून त्या सभासद व ग्राहकांपर्यंत पोहचविण्यात आम्ही नेहमीच अग्रणी राहिलेलो आहे.

आपल्या सेवेत डि. वाय. पाटील जनविकास निधी लि. तत्पर आणि विनम्र सेवा देण्यासाठी सदैव अग्रेसर आहे. बँकिंगच्या अथांग सागरात आर्थिक ठेवीचा थेंब साठविण्यासाठी, आम्ही आपल्या सारख्या सुजान व जागृत ग्राहकांना आमंत्रित करीत आहोत.

अध्यक्षांचे मनोगत

 

 

आम्हाला अभिमान आहे डि. वाय. पाटील जनविकास निधी लि. परिवारातील प्रत्येक सदस्याचा आणि प्रत्येक सदस्याला जिव्हाळ्याने व उत्तम सेवा देऊन जपणाऱ्या आमच्या कर्मचाऱ्यांचा डि. वाय. पाटील जनविकास निधी लि. स्थापनेपासूनचा प्रवास आम्हा सर्वांकरिता संघर्षाचा आहे, असंख्य अडचणींवर सकारात्मक मार्ग काढत आमची वाटचाल सुरु आहे. पाठीशी असलेल्या परिवारातील सदस्य आम्हाला बँकिंग क्षेत्रातील अत्याधुनिक सेवा-सुविधा देण्याची प्रेरणा देतात. "माझी ठेव माझा अभिमान" हे ब्रीदवाक्य डोळ्यांसमोर ठेवुण आम्ही नेहमीच ग्राहकांचा विश्वास सार्थ ठेवला आहे व हाच विश्वास आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी ठरतो. संस्थेच्या प्रवासाबद्दल सांगायचे झाले तर हा प्रवास आमच्यासाठी कसोटीचाच होता व नेहमीच राहणार.

डि. वाय. पाटील जनविकास निधी लि. परिवारातील हजारो सदस्यांचा विश्वास, त्यांच्या ठेवींची जबाबदारी, ठेवींवर चांगला परतावा व सुरक्षितता, उत्तम सेवा इ. मध्ये आम्ही व आमचे कर्मचारी कुठेही कमी पडू नयेत याची काळजी घेत “आपल्याकडे ठेवी किती यापेक्षा आपल्यावर ग्राहकांचा विश्वास किती” हे महत्वाचे मानत प्रगतीच्या वाटेवरील आमचा प्रवास सुरु आहे. व्यवसायापलीकडेही समाजाचे आपण काही देणे लागतो, ज्या समाजाने आपल्याला उभे केले, प्रेम दिले त्यांच्याप्रती आपलेही काही कर्तव्य आहे या भावनेतून आम्ही विविध सामाजिक उपक्रम राबवित असतो. नि:स्वार्थी सामाजिक कार्य या भावनेने सुरु झालेल्या या कार्याला आमच्या विचारांपेक्षा अधिक प्रोत्साहन मिळाले, अनेकांनी विविध उपक्रमामध्ये सहभागी होऊन आणि अनेकांनी या उपक्रमांकरिता आर्थिक देणगी देऊन आमचे मनोबल वाढवले. अनेक गरजूंच्या चेहऱ्यावरचे आनंदरुपी प्रेम आम्हाला पुढील कार्यासाठी प्रेरणा देत असते, अर्थातच तुम्हा सर्वांची साथ महत्त्वाचीच. येणाऱ्या काळात आम्ही ग्राहकसेवेस अनेक आधुनिक सेवा-सुविधा घेऊन येतोय, याकामी तुमची साथ असेलच.

सृजनात्मक उद्देश व सकारात्मक उद्दिष्टपूर्तीचा ध्यास घेऊन आजपर्यंत संस्थेतील प्रत्येक सदस्याने काम केले, त्यामुळेच संस्था आज यशाचे शिखर गाठत आहे. तुम्ही देत असलेल्या सहकार्याबद्दल संस्थेच्या वतीने आपले मनःपूर्वक आभार !

WhatsApp Image 2020-08-27 at 1.26.56 PM.

मा.श्री.शहाजी ज्ञानू पाटील

संस्थापक अध्यक्ष